संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजने अंतर्गत मासिक आढावा सभेमध्ये 82 प्रकरणे मंजूर.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजने अंतर्गत मासिक आढावा सभेमध्ये 82 प्रकरणे मंजूर.


उपसंपादक - नितेश मॅकलवार


मुल - शासनाने निराधार ,अपंग,वृद्धलोकांसाठी संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्याची योजना कार्यन्वित केली आहे.त्या अनुषंगाने मूल तालुक्यात असलेल्या संजय गांधी निराधार समितीची आज दिनांक 29/08/2023 ला मासिक आढावा सभा सौ. वंदना ताई अगरकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आले. नायब तहसीलदार ओकांर ठाकरे यांनी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे अर्ज मंजूर करण्यात आले.


श्रावणबाळ - 34 प्रकरणे

वृद्धापकाळ - 06 प्रकरणे 

संजय गांधी निराधार - 31 प्रकरणे 

इंदिरा गांधी विधवा - 11 प्रकरणे 


असे एकूण 82 प्रकरणे मंजूर करण्यात आले.व काही त्रुटी असणारे अर्ज अर्जदारांकडून पूर्तता करण्यात  येऊन सादर करण्यात येतील व दर महिन्यात संजय गांधी निराधार योजनेची बैठक होणार असल्याची यावेळी ठरवण्यात आले.यावेळी उपस्थित सौ. वंदना ताई अगरकाटे अध्यक्ष,श्री.मुन्ना कोटगले सदस्य,श्री.नितीन गुरुनुले सदस्य, श्री.अनुप नेरलवार सदस्य,श्री.दिलीप पाल सदस्य,श्री.राकेश ठाकरे सदस्य,श्री.नामदेव कावळे सदस्य,नायब तहसीलदार संगायो मूल,संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल, मुख्याधिकारी नगरपरिषद मूल उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !