नक्शा चित्रपट 15 ऑगस्ट ला प्रदर्शित होणार.
★ मुल शहरातील स्थानिक कलावंतांना संधी देत नक्शा चित्रपटाची निर्मिती.
★ प्रेस क्लब मूल पत्र परिषदेत चित्रपटाची माहिती.
नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : मुलवासीयांचे प्रेम मिळाल्यास आणखी चित्रपट निर्मिती नक्शा चित्रपटाचे कलावंतांचा संकल्प मूल परिसरातच चित्रपटाची शूटिंग करून स्थानिक कलावंतांना संधी देत तयार करण्यात आलेल्या नकशा चित्रपट दिनांक 15 ऑगस्ट रोजी युट्युब वर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाला मूल तालुक्यातील जनतेचे प्रेम मिळाल्यास आणखी नवे चित्रपट निर्मिती करू असा आशावाद नक्शा चित्रपटाचे कलावंतांनी आज प्रेस क्लब मुल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
स्थानिक कलावंताने तयार केलेल्या या चित्रपटाबद्दल मुलवासीयात उत्सुकता असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.युट्युब वर या ट्रेलरला प्रचंड प्रसिद्धी मिळाल्याने या कलावंतांचा उत्साह आणखी वाढला आहे.
15 ऑगस्ट रोजी सकाळी हा चित्रपट युट्युब वर प्रदर्शित करण्यात येणार असून यूट्यूब चैनल वर हा चित्रपट मुलवासी यांना पाहता येईल.या चित्रपटाचे कलावंत प्रफुल येलचलवार,शुभम येवतकर,मारोती जराते, गणेश मंथनवार,कुणाल गायकवाड, कुमूद भोयर, धनंजय.पी.बद्देलवार,अमोल गेडाम,सचिन गेडाम यांनी आज चित्रपट निर्मितीची भूमिका, चित्रपट तयार करताना आलेल्या अडचणी, अनुभव पत्रकार परिषदेत कथन केले.