प्रा.महेश ठेंगरे यांना आचार्य(Ph.D.) पदवी ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान.



प्रा.महेश ठेंगरे यांना आचार्य(Ph.D.) पदवी ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान.


अमरदीप लोखंडे - सहसंपदक


ब्रम्हपुरी : दिनांक,१३/०७/२३ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या दहाव्या दीक्षांत समारंभामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेर नावरगाव येथील  प्रा. महेश ठेंगरे यांना  प्राणिशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त प्रदान करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या दहाव्या दीक्षांत समारंभामध्ये मुख्य अतिथी.


भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु, अध्यक्ष श्री. रमेश बैस मा. कुलपती गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तथा राज्यपाल महाराष्ट्र, विशेष अतिथी श्री. एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. नितीन गडकरी मा.केंद्रीय मंत्री,महामार्ग व रस्ते वाहतुक भारत सरकार, श्री. देवेंद्र फडणवीस मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर प्रमुख उपस्थिती श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री वने, सांस्कृतिक विभाग व मत्स्य व्यवसाय, महाराष्ट्र राज्य, डॉ. विजयकुमार गावित मा. मंत्री आदिवासी विभाग, महाराष्ट्र राज्य, डॉ. प्रशांत बोकारे कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. श्रीराम कावळे प्र-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली उपस्थित होते.


प्रा.डॉ महेश ठेंगरे यांनी HAEMATOLOGICAL INVESTIGATION IN WILD CAUGHT EMBALLONURID BAT, TAPHOZOUS KACHHENSIS (DOBSON) DURING REPRODUCTIVE CYCLE", या विषयावर डॉ अमीर धमानी प्राचार्य ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर जि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात शोधप्रबंध सादर केले. विविध प्रयोग , प्रात्यक्षिक, परीक्षण व वैज्ञानिक मापदंड वापरून तसेच प्राचार्य डॉ अमीर धमानी यांचे उत्कृष्ठ मार्गदर्शन घेऊन सदर शोधप्रबंध तयार करण्यात आले आहे. त्यांच्या यशाबद्दल शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !