आरोपी लवकरच जेरबंद होण्याची शक्यता सिरोंचा पोलीस आरोपी च्या शोधात.
★ रंगयापल्लीच्या युवतीच्या हत्येला प्रेमाची किनार.
विजय नरचुलवार - प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली येथे गुरुवार, १३ जुलैच्या मध्यरात्री स्वतःच्या घरात खाटेवर झोपलेल्या २० वर्षीय तरुणीची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून रहस्यमय हत्या झाली. या हत्येमागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
एस.के.24 तास ला प्रकाशित झालेली बातमी |
ओलिता रामय्या सोयाम (२० वर्ष) हिच्या गळ्यावर धारदार शस्त्र चालवून झोपेतच तिचा जीव घेतला. त्यानंतर घराच्या मागील दारातून पळ काढला. सदर युवती बारावीपर्यंत शिकलेली आहे.ती कामावर सुद्धा जात होती.त्यामुळे बाहेरील काही व्यक्ती तिच्या संपर्कात आल्या.ओलिताकडील मोबाइलच्या डेटावरून पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.दरम्यान संबंधितांची चौकशी केली.त्यावरून या हत्येमागे प्रेम प्रकरणाचा दाट संशय लवकरच आरोपीला जेरबंद करण्यासोबत या खुनाचे रहस्य उलगडेल,असा विश्वास सिरोंचा पोलिसांनी व्यक्त केला आहे.