अतिवृष्टीमुळे मोरबे डॅम जवळ असलेल्या इरसाल गडाचा भाग खचल्याने इरसाल वाडी ही वस्ती जमीन दोस्त.
नवी मुंबई प्रतिनिधी : दशरथ कांबळे
नवी मुंबई : बुधवार दि. २० जुलै रात्री अतिवृष्टीमुळे मोरबे डॅम जवळ असलेल्या इरसाल गडाचा भाग खचल्याने त्यावरील इरसाल वाडी ही वस्ती जमीन दोस्त झाली.
सदर ठिकाणी रात्री रेस्क्यूचे काम करीत असताना आपले नवी मुंबई महानगर पालिकेचे बेलापूर येथील अग्निशमन विभागातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास सुरू असल्याची प्राथमिक महिती समोर येत आहे.