ब्रम्हपुरी तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी मनसेचे निवेदन.
★ मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.संजय पारटवार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१२/०७/२३ ब्रह्मपुरी शहर व तालुका शांत समजला जात असला तरी तालुक्यात अनेक गंभीर गुन्हे घडलेले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रह्मपुरी कडून पोलीस प्रशासनास यावर नियंत्रण आणण्यास निवेदन देण्यात आले.
सध्या ब्रम्हपुरी शहरात अनेक अवैध धंद्यांना उत आला आहे. यात रेतीची अवैध वाहतुक, लहान-लहान वादावरून हाणामारी, खूनासारखे गंभीर गुन्हे तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मनात कसल्याही प्रकारचा भय नसने इत्यादी प्रकार सातत्याने प्रत्यक्ष जाणवत आहेत. त्यामुळे डॉ.संजय पारटवार जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाव्दारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस प्रशासनाचा धाक / वचक रहावा व सामान्य जनतेला याचा त्रास होणार नाही या दृष्टिने ब्रम्हपुरी शहरात व ब्रम्हपुरी क्षेत्रातील ग्रामीण भागात नियमित पोलीस गस्त सातत्याने करण्यात यावी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशाप्रकाराचे विविध गुन्हे घडण्याआधीच त्यांना रोखता येईल, अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतांना दिपक मेहेर,सुनील साडे,रमाकांत गायक,शेखर महाजन उपस्थीत होते.