बेला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हा स्तरीय प्रवेशोत्सव साजरा.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : जि.प.उच्च प्राथ. शाळा,बेला येथे आनंददायी वातावरणात शाळा शुभारंभ आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश पारधी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारीसमीर कुर्तकुट्टी हे होते.
तर अतिथी म्हणून पंचायत समिती भंडारा च्या सभापती रत्नमाला चेटुले शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के,शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोरलिकर गटविकास अधिकारी पं.स.भंडारा च्या डॉ. संघमित्रा कोल्हे, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड शिक्षण विस्तार अधिकारी, शिल्पा निखाडे केंद्र प्रमुख गिरिधारी भोयर माजी जिल्हापरिषद सभापति संजय गाढवे बेला ग्रामपचायतीतर्फे सरपंच सौ.गायधने ,उपसरपंच कांबळे तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य व सर्व शा.व्य.स. सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते इ.1लीत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षवण,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पुस्तक वाटप व गणवेश वाटप करण्यात आले.उपास्थित पाहुण्यांनी भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व नवोदितांचे कौतुक केले.गोड जेवणाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गाढवे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सौ.भुरे यांनी केले.