दोन दुचाकींच्या धडकेत तिघे ठार ; तीन गंभीर
★ व्याहाड खुर्द जवळील - गडचिरोली महामार्गावरील घटना.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
व्याहाड खुर्द : येथील रोहणकर पेट्रोलपंपसमोर दोन दुचाकीणा समोरासमोर धडक होऊन तिघे जागीच ठार झाल तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झाला.हरीश पांडुरंग सहारे (३५, रा. नांदगाव, सिंदेवाही), सागर रघुनाथ शेडमाके (२२) व प्रशांत आत्राम (३०,दोघेही रा.हिरापूर,सावली) अशी मृतकांची नावे आहेत.
या अपघातात अजय विजय गोरडवार (३२,रा.सावली),सुमित शेडमाके (रा.हिरापूर) व प्रशांत चावरे (रा. नांदगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले आहे.जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातग्रस्त दोन्ही दुचाकींवर प्रत्येकी तिघेजण बसले असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमीवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.