आय.टी.आय.प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढ.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे शिल्प कारागीर योजनेच्या अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या प्रवेश फेरीचा अंतिम दिनांक २५ जुलै असा होता. गेल्या काही दिवसातील राज्यातील काही भागातील पूरस्थितीचा विचार करता पहिल्या प्रवेश फेरीचा अंतिम दि.२६ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे.
याचबरोबर दुसऱ्या फेरीसाठी विकल्प सादर करण्याची मुदत २६ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. याचबरोबर अद्याप प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांना एसएमएस द्वारे कळविण्यात येत आहे. तरी पहिल्या फेरीचे प्रवेश जास्तीत जास्त होण्यासाठी संस्था स्तरावरून उमेदवारांना संपर्क करण्यात येत असून त्यानुसार उमेदवारांनी प्रवेश फेरीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केले आहे.