वंचित बहुजन आघाडी तर्फे परिवहन मंत्र्यांना मंत्रालयात निवेदन.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : भंडारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी मंत्रालयात जाऊन परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने ज्या समाज सेवकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिलेला आहे त्यांना आराम, निमआराम बस प्रवास मोफत करण्याची सवलत असते परंतु त्यांना शिवशाही या बस मध्ये सवलत नसते मात्र महिला, जेष्ठ नागरिक, पत्रकार , यांना मात्र प्रवास सवलत असते त्यामुळे याकरिता वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यातर्फे मंत्रालय परिवहन मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शिवशाही बस मोफत लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा संघटक डी जी रंगारी इत्यादी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थीत होते व सवलत देण्याचे मागणी करण्यात आली.