दलित मूस्लिम आदिवासी ओबीसी अन्याय विरोधी ऐक्य परिषद.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : संविधान बचाव संघर्ष समिति भंडारा चे नेतृतवात,मुस्लिम,ओ बि सी,आदिवासी व बुद्धिस्ट बांधवांची सयुक्त पत्र परिषद दिनांक,१७/०७/२०२३ रोजी भंडारा शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
सध्या देशात दलित आदिवासी मुस्लिम व ओबीसी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा सुरू केला असून दलित आदिवासी मुस्लिम व ओबीसी समाजाच्या तरुणांचा रोजगार हिरावून घेतल्या जात आहे. बहुजन समाजाला रोजगारापासून वंचित करून त्यांना आर्थिक गुलाब बनवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.
देशातील नवीन संसद भवनामध्ये उद्घाटन करतेवेळी हिंदूधर्म पिठाच्या धर्मगुरूकडून मंत्र उपचार करण्यात आले व संसद भवनाची स्थापना केली गेली, नव्याने मनुवाद व धार्मिक हुकूमशाही लादण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत मध्य प्रदेश राज्यात एका आदिवासी तरुणावर सुवर्णांकडून मूत्र विसर्जन केले गेले तर त्याच राज्यात एका आदिवासी तरुणाला निर्विस्तर करून त्याच्या गळ्यात चपलाची माळ घालून गावभर त्याची दिंड काढली गेली.
उत्तर प्रदेशात देखील मुस्लिम बांधवाला बेदम मारहाण करून त्याला पायाचे तळवे चाटण्यास भाग पाडले तर तिथे एका दलित युवकाला बेदम मारहाण करून त्याला थुंकी चाटण्यास भाग पाडण्यात आले.महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी केली म्हणून नांदेड येथे अक्षय भालेराव नामक युवकाची हत्या केली गेली अशा घटना देशात घडत आहेत व ते सर्व भाजपा शासित राज्य असल्याचे दिसून येतात.
देशात दलित आदिवासी मुस्लिम यांच्यावर अन्याय करणाऱ्यांवर कठोर शिक्षा करण्यात यावी ज्या राज्यात अशा घटना होत आहेत त्यांचे शासन बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी व खाजगीकरण थांबवावे, गुगलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर आहे ते हटविण्यात यावे.या सर्व घटनेच्या निषेधार्थ दिनांक 2 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय पुढे तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या पत्र परिषदेला भंडारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे मोहमद सरफराज शेख,आदिवासी समाजाचे अजबराव चिचामे, बिसनजी सय्याम,प्रभाताई पेंदाम,अशोक उईके.ओबीसी नेते, श्रीकृष्ण पडोळे,संजय मते,डी पी ढगै,बुद्धिस्ट समाजाचे रोशन जांभूडकर, माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्ने, हिवराज उके, आसित बागडे, गोवर्धन कुंबरे, संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हा महासचिव शशिकांत भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.