टिप्परच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू ; निलज ते पवनी महामार्गावरील घटना. मृत्यूला जबाबदार कोण ? ठेकेदार/टिप्पर चालक/लोकप्रतिनिधी.

टिप्परच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू ; निलज ते पवनी महामार्गावरील घटना.


मृत्यूला जबाबदार कोण ? ठेकेदार/टिप्पर चालक/लोकप्रतिनिधी.


 डिव्हायडरची पर्यायी व्यवस्था नाही


नरेंद्र मेश्राम


भंडारा : पवनी निलज ते कारधा या महामार्गावरील पवनी येथे रस्ताओलांडत वृद्धाला भरधाव येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.


प्राप्त माहितीनुसार स्थानिक बस्तरवारी वार्ड येथील लहू लहानु वैद्य (७५) हे दिनांक १३  जुलैला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयातून परत येताना शकील मिस्त्री ते तुलसी मिस्त्री यांच्या दुकानाजवळील चौरस्त्यावरून रस्ता ओलांडत असताना लहू वैद्य यांना भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने चिरडून काढले शरीराचा चेंदामेंदा  झाला होता.


चौरस्त्यावर ब्रेकर सुद्धा टाकले नाही घटनास्थळावरून टिप्पर चालक पळून गेला पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी  ट्रक क्रमांक  एम एच४० बीजी ०५९० ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहेत. लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे  महामार्गाचे डिव्हायडर रस्त्याची देखरेख व इतर कामे रखडलेली आहेत. महामार्ग पूर्णत्वास केव्हा येईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !