हिंदुस्तान पेट्रोलियमच्या वर्धापन दिनानिमित्त पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे स्वच्छता पंधरवाडा अभियान.
विजय नरचुलवार - प्रतिनिधी
गडचिरोली : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड च्या वतीने हिंदुस्थान पेट्रोलियमच्या 49 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे . याच अभियाना अंतर्गत आज दि . 15 जुलै 2023 रोजी मे. पिपरे पेट्रोलियम सर्व्हिस, गडचिरोली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व पेट्रोल पंप परिसरात स्वच्छता करण्यात आली.
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिलेला आहे याच अभियाना अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचे औचित्य साधून पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस गडचिरोली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी पिपरे पेट्रोलियम चे मालक प्रमोदजी पिपरे,संचालक अनुराग पिपरे, व्यवस्थापक प्रभाकर वाघाडे,प्रभाकर खोब्रागडे व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंप परिसरात स्वच्छता केली व नागरिकांना स्वच्छता अभियानाचा संदेश दिला. यावेळी पेट्रोल पंपावरील ग्राहक व नागरिक उपस्थित होते.