पुरावे असूनही हजारो झोपडीधारक अपात्र ; नवी मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार उघड

पुरावे असूनही हजारो झोपडीधारक अपात्र ; नवी मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार उघड


नवी मुंबई प्रतिनिधी : दशरथ कांबळे


मुंबईसह पुण्यासारख्या शहरातील 2000 पर्यंतच्या मोफत तर त्यानंतर 2011 पर्यंत झोपडीधारकांना 2.5 लाखात सदनिका उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेने वास्तव्याचे पुरावे असतानाही तुर्भे येथील हजारो झोपडीधारकांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या तसेच स्थानिक राजकर्त्यांच्या भोंगळ कारभाराविषयी स्थानिकांत संतापाची लाट पसरली आहे.


नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या 2021 च्या झोपडपट्टी सर्वेक्षणानुसार संपुर्ण पालिका क्षेत्रात सूमारे 41805 झोपडीधारक असून त्यातील 19089 जणांना पात्र ठरवले आहे. पालिकेने 22716 झोपडीधारक अपात्र असल्याची नोंद केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने गेली 50 वर्षे नवी मुंबईत वास्तव्य करणारे झोपडीधारक धास्तावले आहेत. या सर्वेक्षणानंतरही आपण पात्र आहोत की अपात्र याची कल्पना झोपडीधारकांना नसून स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत मौन बाळगल्याने संतापाची लाट उसळली आहे.


2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते.एकीकडे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हजारो घरे बांधण्याचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र हक्काचे घर असणाऱ्यांनाच बेघर करण्याचा घाट घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्मार्ट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत सुरु असल्याचे समोर आले आहे. 2001 च्या केलेल्या सर्वेक्षणानंतर तब्बल 22 वर्षांनी महापालिकेने झोपडीधारकांना ते पात्र किंवा अपात्र असल्याविषयी अवगत न केल्याने संभ्रमात असून संबंधितांना पत्र पाठवून त्यांच्याकडून पुन्हा एकदा वास्तव्याचे कागदपत्र मागवून घ्यावेत अशी मागणी स्थानिक करत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !