सामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन ब्रम्हपुरीत भव्य निदर्शने व धरणे आंदोलन.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : दिनांक,२९/०७/२३ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक) ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण व नगरपरिषद क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे,प्रशासनाचे लक्ष वेधून त्याची तात्काळ पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी बौध्द समाज, तालुका ब्रम्हपुरी यांच्या वतीने दिनांक २८ जुलै२३ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे भव्य धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
सर्व प्रथम महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर स्त्री सन्मानाची लक्तरे वेशीवर टांगण्याऱ्या मणिपूर येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
तालुक्यातील ग्रामीण नागरिक व नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांनी सुस्त झोपलेल्या शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याचा रोष व्यक्त करीत ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने गेल्या साडेचार वर्षात ब्रम्हपुरी चा विकास केला नाही त्यामुळेच आज अनेक वॉर्डातील रोड ,नाल्या, पाणी आदीचे प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत.
असाही रोष आयोजित भव्य धरणे व निदर्शने आंदोलनात नागरिकांनी व्यक्त केला.
याप्रसंगी डॉ.प्रेमलाल मेश्राम,जीवन बागडे,प्रा.संतोष रामटेके, प्रशांत डांगे, विनोद झोडगे,डॉ सागर माकडे, नरू नरड, डी . एम रामटेके, माजी नगरसेवक मनोज भूपाल आदी मान्यवरांनी आपापल्या तीव्र भावना व्यक्त करीत नगर परिषदेच्या आणि जनप्रतिनिधीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून नाराजी व्यक्त केली.
आयोजित भव्य धरणे व निदर्शने आंदोलनात
१) ब्रह्मपुरी तालुक्यातील निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना थकीत निधी तात्काळ देण्यात यावी.
२) ग्रामीण व शहरातील नागरिकांना घरकुलाची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी.
३) नगरपरिषद क्षेत्रातील अनेक वार्डातील रोड, नाल्या,पाणी व अन्य दैनंदिन सुविधांची त्वरित पूर्तता करावी.
४) शहरातील नवीन वसाहती तील सुधारणा बाबत नगर प्रशासनाने
जातीने लक्ष घालावे.
५) नगरपरिषद क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.
६) घरकुलाच्या मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात यावी.
७) देवानंद कांबळे व त्या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात होणाऱा मानसिक व शारीरिक त्रास थांबवून वेळेत उपाययोजना करावी व जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
८) नगरपरिषद च्या सफाई कामगार तसेच घनकचरा केंद्रातील कामगारांच्या रोजीत वाढ करून त्यांना संरक्षणात्मक सुविधा पुरविण्यात याव्यात.
९) शहरातील सुशिक्षित बेरोजगार अभियंतिकांनाच नगर परिषदेची कामे देण्यात यावी.
१०) पावसाळ्यात बाराही तलावाच्या पाण्यामुळे शेष नगर व आजूबाजूच्या परिसराततील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा.
११) वार्डातील नागरिकांच्या समस्येचे निराकरण करणाऱ्या वार्डात कधी न भटकणाऱ्या अपयशी नगरसेवकावर कारवाई करण्यात यावी.
१२) नगरपरिषद क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना कायमरुपी पट्टे देण्यात यावी.
१३) तालुक्यातील जबरान दूध शेतकऱ्यांना व अतिक्रमधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावी.
१४) सम्राट लान व दक्षिणेकडील डीपी रोड तसेच गणवीर हॉस्पिटल रोड चे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे.
१५) रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बनवण्यात यावे.
१६) शहरातील मुख्य रस्त्यावर ट्राफिक सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी.
१७) शहरातील मुख्य चौकातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावी.
१८) शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजकांची निर्मिती करण्यात यावी.
१९) बोंडेगाव वार्ड क्रमांक १ व शहरातील इतर वार्डाचा सिटीसर्वे करण्यात यावा.
२०) नागरिकांच्या दैनंदिन वैयक्तिक समस्यांची प्रशासनाने दखल घेऊन त्याचे निराकरण तात्काळ करावे. या मागण्यांचे निवेदन मान.मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.तर नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत नगरपरिषद क्षेत्रातील मागण्यांचे निवेदन मान.जिल्हाधिकारी यांना मुख्याधिकारी न प यांच्या मार्फत पाठविण्यात आले.निवेदन स्विकारताना नगरपरिषदेचे अधीक्षक येरणे,उपाध्यक्ष अशोक रामटेके आरोग्य सभापती दिनेशचंद्र शुक्ला यांनी स्वीकारले.
धरणे व निदर्शने आंदोलनाच्या यशस्वितेसाठी नरेश रामटेके, लीलाधर वंजारी,भीमराव बनकर,रक्षित रामटेके, देवानंद कांबळे,प्रभू लोखंडे, डेनी शेंडे,मनोज धनविज,प्रणय मेश्राम,सूरज मेश्राम,डेविड शेंडे,मदन शेंडे,प्रफुल फुलझेले, सुमेध वालदे, प्रशांत रामटेके घनश्याम सुर्यवंशी आदी समाजबांधवांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन पदमाकर रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट आशिष गोंडाने यांनी केले.