शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. - विनोदभाऊ झाडे
एस.के.24 तास
राजुरा : आज दिनांक 6 जुलै 2023 रोजी सकाळी 7 वाजता मौजा पेल्लोरा येथे पशुसंवर्धन विभाग राजुरा व अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने मा. सिध्देश्वरजी जंपलवार सर पी.यु. मॅनेजर यांचे मार्गदर्शनाखाली गावातील शेतकऱ्यांची पशुधन लंबी आजारावर लसीकरण कॅम्प घेण्यात आला.
यामध्ये लंपी आजाराविषयी डॉ. तानमपल्लीवार व डॉ.भोयर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ झाडे, पशुसखी क्षीरसागर मॅडम यांनी सहकार्य केले. यावेळी 110 शेतकऱ्याच्या 295 जनावरांना (बैल, गाय) यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रक्षेत्र अधिकारी सुभाष चट्टे,प्रदिप बोबडे उपस्थित होते.