मानकापूर - मेटेगाव रोडवरील खड्डे बुजविले - बसचा मार्ग केला सुकर
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : मानकापूर ते चक मानकापूर दरम्यान नाल्याला पूर आला व रस्त्याचे मधोमध खड्डे पडले व वाहतूक बंद झाली. याची दखल घेत काँग्रेसचे विजय कोरेवार व नितीन दुवावार यांनी पुढाकार घेत खड्डे बुजविले व वाहतूक सुरळीत केली.
सावली तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या सावली ते मेटेगाव हा भाग जंगल परिसराचा असून आदिवासी लोकवस्तीची गावे आहेत. नुकतीच अतिवृष्टी झाल्याने मानकापूर ते चकमानकापूर दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला त्यात रोडवर खड्डे पडले.
खड्डे पडल्याने चारचाकी वाहनाची वाहतूक व बससेवा बंद झाली. याबाबतची माहिती मुरमाडीचे सरपंच मडावी,सदस्य युवराज वेटी, सामाजिक कार्यकर्ते अमर कड्याम यांनी प्रशासनाला दिली. मात्र प्रशासनाच्या कामाला दिरंगाई होत असल्याने काँग्रेसच्या भटक्या जाती विमुक्त जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष,विजय कोरेवार,काँग्रेसचे युवा कार्यकर्ते नितीन दुवावार यांनी खड्डे बुजविण्याचे काम केले.यामुळे बससेवा सुरळीत सुरु झाली आहे.
या कामामुळे मानकापूर,चकमानकापूर,मेटेगाव वासियांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.