सिरोंचा पोलीस स्टेशन हद्दीतील येथील रंगयापल्ली घटना.
विजय नरचुलवार - प्रतिनिधी,गडचिरोली
सिरोंचा : दिनांक,14/07/2023 तालुका मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगयापल्ली येथे वीस वर्षीय युवतीची राहत्या घरातच निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना दिनांक 14 जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
ओलिता रामया सोयाम वय 20 वर्ष रा रंगयापल्ली ता. सीरोंचा जि. गडचिरोली असे मृतक युवतीचे नाव आहे. मृतक युवती ही रात्रीच्या सुमारास राहत्या घरी झोपून असतानाच तिची हत्या करण्यात आली. सकाळी सहा वाजताच्या सुमारास तिचा भाऊ अंथरुणाचे कपडे ठेवण्यासाठी मृतक युवती झोपून असलेल्या खोलीत गेला असता त्याला आपली बहीण मृतावस्थेत दिसून आली. तीच्या मानेवर धारदार शस्त्राचे वार होते.
व घराच्या मागचे दार खुले होते. हत्या करून आरोपी पसार झाला असून या घटनेची माहिती सिरोंचा पोलिस ठाण्याला दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले.व मृतक युवतीचे शव सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. या हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शीतल धविले यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे.