मानवसेवेतच खऱ्या ईश्वरप्राप्तीचा आनंद.- माजी मंत्री वडेट्टीवार
★ कर्करोग निदान 'अद्यावत वाहनाचे ब्रह्मपुरीत लोकार्पण.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१४/०७/२३ राजकारण म्हणजे जनतेची सेवा करण्याकरिता मिळालेली जबाबदारीची संधी होय. एक सच्चा जनप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना निवडून देणाऱ्या मतदारांचे ऋण फेडण्याकरिता क्षेत्र विकासासह प्रत्येक मूलभूत समस्यासह आरोग्य रक्षणाची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधीवर असते. राजकारणात संधी साधूंनी स्वार्थ साधले मात्र आपण जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून मतदारसंघातील हजारोंच्यावर नागरिकांना कर्करोग या महाभयंकर प्राणघातक रोगांपासून लढण्यास सहकार्य केले.
ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. हे माझे अहोभाग्यच. मानवरुपी देवताची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून मानवसेवेतच खऱ्या ईश्वर प्राप्तीचा आनंद मिळतो असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कॅन्सर निदान अद्यावत वाहनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी प्राचार्य डॉ. जगनाडे, नगराध्यक्षा रिताताई उराडे, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य स्मिताताई पारधी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, न.प. आरोग्य सभापती अॅड.बाला शुक्ला, नगरसेवक डॉ नितीन उराडे, बाजार समितीच्या उपसभापती सुनिता तिडके, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, नगरसेविका सरीता पारधी, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका लताताई ठाकुर ह्या यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आ. वडेट्टीवार म्हणाले की, देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. अशातच राज्याच्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्करोगाचे रुग्ण असल्याचे पुढे येत असल्याने अनेकांना या जीवघेणा रोगामुळे प्राण गमवावे लागले. सोबतच कर्करोगावर उपचार म्हणजे अतोनात आर्थिक खर्च यामुळे गोरगरीब जनतेला ते न परवडण्यासारखे असल्याने ही गंभीर बाब लक्षात घेऊन एक सच्चा जनसेवक म्हणून कर्करोग या प्राणघातक आजारामुळे मतदार संघातील तथा
जिल्ह्यातील एकाही नागरिकाचा मृत्यू होऊ नये यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त कर्करोग निदान फिरते इस्पितळ वाहन लोकसेवेत अर्पण करीत या मोफत कर्करोग तपासणी मुळे कर्करोग रुग्णांवर व इतर संभाव्य कर्करोग रुग्णांना लाभ होऊन त्यावर वेळीच उपचार केल्यास अनेकांची जीव वाचणार. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेऊन जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य जपावे असे आवाहनही यावेळी राज्याची माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व कर्करोग निदान अद्यावत वाहन निर्मितीसाठी सहकार्य करणारे राहुल जवादे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेमराज तिडके यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राहुल मैंद यांनी केले.