कोचीनारा येथील फरार आरोपी जेरबंद ; चार दिवसांची कोठडी.
एस.के.24 तास
कोरची : पत्नीची निर्घृण हत्या करून उत्तर प्रदेशातील मथुरा येथे साधूचा वेश धारण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यास १८ जुलै रोजी कुरखेडा येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
प्रीतराम भक्त धकाते (४८,रा.कोचीनारा, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. मुलीकडे राहण्यास गेलेल्या पत्नी रेखा धकाते ही जंगलात सरपण गोळा करत होती.२ जुलै रोजी प्रीतरामने तिच्यावर कुन्हाडीने घाव घातले होते.
बातमी प्रकाशित झाली होती. |
यात तिचा मृत्यू झाला होता तर आईला सोडविण्यासाठी आलेली मुलगी श्यामबाई देवांगण हिच्यावर निर्दयी पित्याने हल्ला चढविला होता. त्यानंतर तो पळून गेला. कोरची पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मथुरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. १८ रोजी त्यास कुरखेडा न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक निरीक्षक गणेश फुलकवर यांनी दिली.
आरोपी मालवाहू ट्रकमधून पोहोचला मथुरेत : -
★ पत्नीचा खून करून पळालेल्या प्रीतराम धकाते याने मोटरसायकल जंगलात ठेवून धूम ठोकली. महामार्गावर येऊन एका मालवाहू ट्रकला हात केला व त्यातून थेट उत्तर प्रदेशातील मथुरेत पोहोचला.
★ पोलिसांना भणक लागू नये,म्हणून त्याने वेशभूषा बदलली. साधूचा वेश परिधान करून तो मंदिराजवळ वावरत होता. मथुरेतील ललितनगर धाम परिसरामध्ये पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या.