नगरपरिषदेची नवीन इमारत शहराच्या प्रगती व विकासाच्या बांधिलकीचा पुरावा. - माजी मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व राजीव गांधी सभागृहाचे लोकार्पण.

नगरपरिषदेची नवीन इमारत शहराच्या प्रगती व विकासाच्या बांधिलकीचा पुरावा. - माजी मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार


ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व राजीव गांधी सभागृहाचे लोकार्पण.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,०६/०७/२३ ब्रम्हपूरी शहरातील जनतेसाठी नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आपण या ठिकाणी करीत आहोत.कार्यालय हे कार्य लयास नेण्यासाठी असते. कार्यालय हे पवित्र ठिकाण आहे. ज्या प्रमाणे मंदिर, मस्जिद गुरुद्वारा, चर्च ही धार्मिक स्थळे पवित्र आपण मानतो. त्याचप्रमाणे हे ठिकाण असून प्रत्येक नागरिकांच याठिकाणी समाधान झालं पाहिजे याची नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील खबरदारी घ्यावी. ब्रम्हपूरी नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत ही शहराच्या प्रगती आणि विकासासाठी असलेल्या सामायिक बांधीलकीचा पुरावा आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रीताताई उराडे, न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्याधिकारी अर्शिया जुही, तहसीलदार उषा चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती खेमराज तिडके, बांधकाम सभापती विलास विखार, आरोग्य सभापती दिपक शुक्ला, महीला व बालकल्याण सभापती सुनिताताई तिडके, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, नगरसेवक नितीन उराडे, नगरसेवक हितेंद्र राऊत,  नगरसेवक प्रितीश बुरले, नगरसेवक मनोज वठे, नगरसेवक गौरव भैय्या, नगरसेवक सतीश हुमणे, नगरसेवक सागर आमले, नगरसेवक राकेश कराडे, नगरसेविका सरीता पारधी, नगरसेविका लताताई ठाकूर, नगरसेविका निलीमाताई सावरकर, नगरसेविका अर्चना खंडाते, नगरसेविका अंजली उरकुडे, नगरसेविका सपना खेत्रे, नगरसेविका रुपालीताई रावेकर,नगरसेविका पुष्पा गराडे, माजी नगराध्यक्षा योगिता ताई बनपुरकर, माजी नगराध्यक्ष पवन मगरे हे उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी शहरात झपाट्याने विकासकामे सुरू असुन विविध प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतींचे बांधकाम सुरू असुन काही इमारती पुर्णत्वास आल्या आहेत. त्यामध्ये 100 खाटांचे शासकीय रुग्णालय, ईलायब्ररी, क्रिडासंकुल, तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत, सांस्कृतिक सभागृह, न्यायालयाची इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह व कार्यालय इमारत पुर्णत्वास आल्या आहेत. शहरातील विविध चौकांच्या सौंदर्यीकरणासाठी देखील निधी उपलब्ध झालेला आहे. त्या कामांदेखील लवकरच सुरवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


माझ्या दारात आलेल्या माणसाला मी निराश करून कधीच पाठवत नाही. त्याच्या समस्येचे निराकरण मी करतो. समाधानी होऊनच तो माणुस माझ्या दारातुन जात असतो ह्यामुळे मला स्वतःला व्यक्तिगतरित्या समाधान लाभत असुन हिच माझी खरी कमाई असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी तर सुत्रसंचलन राहुल मैंद यांनी केले. तर आभार बांधकाम सभापती विलास विखार यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !