जेवनाळा निमगाव पुलावर पडल्या भेगा.चौकशी ची ग्रामस्थांची मागणी ; कामाचा दर्जा निकृष्ट,ग्रामस्थांचा आरोप. ★ जेवनाळा निमगाव पुलावरून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन करता प्रवास.

जेवनाळा निमगाव पुलावर पडल्या भेगा.चौकशी ची ग्रामस्थांची मागणी ; कामाचा दर्जा निकृष्ट,ग्रामस्थांचा आरोप.


★ जेवनाळा निमगाव पुलावरून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन करता प्रवास.


नरेंद्र  मेश्राम


भंडारा : लाखनी तालुक्यातील जेवनाळा व निमगाव घोडेझरी कोलारा झरप या छोट्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे.त्यामुळे शेतकरी व विद्यार्थांना अनेक वर्षांपासून निमगाव रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाची मागणी होती. ही   अनेक वर्षांनी पूर्ण झाली मात्र या पुलियावरून या पावसाळ्यात जायला मिळेल ही अपेक्षा मात्र भंग होताना दिसत आहे. या पुलियाचे काम संथ गतीने होत असल्याने पुलियाला लागले दोन्ही रस्ते हे चिखलाने माखलेले असल्याने या ठिकाणी विद्यार्थी हे जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे.


जेवनाळा वासियांकडून बहु प्रतिक्षित असलेली पुलियाची मागणी मागल्या वर्षी आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रयत्नांतून पूर्ण झाली त्यामुळे शेतकरी व विद्यार्थी यांच्यात आनंददायक वातावरण निर्माण झाले होते.काम सुरू झाले त्यावेळी या येणाऱ्या पावसाळ्यात आपण या पुलाने जाऊ ही अपेक्षा विद्यार्थी व शेतकरी उराशी बाळगून होते.मात्र   असे होऊ शकले नाही या पुलाचे काम पूर्णत्वास येण्यास आहे.पुलाला नाल्याच्या कडेने जोडणारे मार्ग हे अद्याप तयार व्ह्याचे आहेत.पुलावरील सुरक्षा भिंत अद्याप तयार व्हायची आहे.त्यामुळे याही पावसाळ्यात नाल्यातील पाण्यातून पोहून जाण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.


निमगाव येथील विद्यार्थी जेवनाळा येथील मध्यामिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात त्यासाठी त्यांनी पाच किमी अंतर फेरा मारत शाळेत यावे लागते मात्र या पुलामुळे ते अवघ्या तीन किमी अंतरात शाळेत येतात त्यामुळे विद्यार्थी या पुलावरून येण्यास पसंती देत आहेत.मात्र या ठिकाणी अर्धवट झालेले काम व चिखळमय झालेल्या पुलाच्या दोन्ही बाजू ह्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात.त्यामुळे याचे काम संथ गतीने होत असल्याचा ग्रामस्थ आरोप करीत आहेत.


विना फलक काम सुरू : - 


या पुलाची माहिती देणारे फलक या ठिकाणी लावलेले नाही .त्यामुळे हे काम कोणत्या कांत्रतदाराला दिले आहे.या कामाची रक्कम किती काम पूर्ण करण्याचा कालावधी किती याची माहिती कुणालाही मिळत नाही. अश्या छुप्या पद्धतीने काम करणाऱ्या कांत्रदरावर कार्यवाही करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.



पुलावर पडलेल्या भेगांची भरली धास्ती : -


या पुलावर नुकतेच सिमेंट काँक्रिट चे काम झाले आहे मात्र या कामावर पडलेल्या भेगा ह्या भयावह दिसतात.त्यामुळे हे काम निकृष्ट तर नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे.या पडलेल्या भेगा पाहून शेतकऱ्यांच्या मनात धास्ती भरली असून अत्यावशक असलेल्या पुलाचा दर्जा या भेगांवरून दिसत आहे त्यामुळे या बहु प्रतीक्षित पुलाची पाहणी करून काम करणाऱ्या यंत्रणेवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.या पुलावर पडलेल्या भेगा ह्या किरकोळ असल्याचे मत  बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी संगीले असले तरी या भेगा चिंता वाढविणाऱ्या ठरू शकतात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.           

                                        ‌                  

खूप वर्षाच्या मागणीनंतर पुलियाला  मंजुरी मिळाली आहे पावसाळ्या पुर्वी काम पूर्ण होईल असे वाटत होते उलट काम बरोबर वाटत नाही आत्ताच पुलियाला भेगा पडल्या शासन स्तरावर पुलियाच्या कामाची चौकशी करून काम दोषपूर्ण आढळून आल्यास कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी. - विठ्ठल गोंदोळे शेतकरी जेवनाळा

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !