संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्हा कार्यकारिणी गठीत.

संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्हा कार्यकारिणी गठीत.


नरेंद्र मेश्राम


भंडारा : शनिवार दिनांक एक जुलै रोजी स्थानिक भंडारा विश्रामगृह येथे संविधान बचाव संघर्ष समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रोशन जांभुळकर प्रमुख मार्गदर्शक माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, मुंबईहून आलेले डॉक्टर बी डी मेश्राम,कस काय कर्मचारी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यकांत हूमणे मंचावर उपस्थित होते.

देशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करीत असताना मनुवादी लोक भारतीय संविधानावर वेगवेगळ्या प्रकारे आघात करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


त्याकरिता भंडारा जिल्ह्यात संविधान बचाव संघर्ष समितीची निर्माण करण्यात आले,  ही संघर्ष समिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावात संविधान जनजागृती करेल व संविधानाचे महत्त्व प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचे काम करणार असल्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आली आहे.सदर वेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपले मत मांडले.


या संघर्ष समिती करिता सर्व समाजातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते, त्याकरिता दिनांक 16 जून रोजी महत्त्वाची बैठक विश्रामगृहात पार पडली होती, व समितीची कार्यकारिणी मंडळाची निवड दिनांक १ जुलै रोजी करण्याचे ठरले होते त्यानुसार, उपस्थित सर्व समाज बांधवांमधून सर्वानुमते अध्यक्ष म्हणून रोशन जांभुळकर, तर महासचिव शशिकांत भोयर,कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्ने,  कार्याध्यक्ष अचल मेश्राम यांची निवड करण्यात आली.तसेच जिल्हा सल्लागारपदी श्रीकृष्ण पडोळे,डी.पी ढगे चंद्रशेखर खोब्रागडे,आशिष सतदेवे, राजकुमार मेश्राम,दिलीप वानखेडे,धनपाल गडपायले, परमानंद मेश्राम राष्ट्रपाल नाईक,नित्यानंद मेश्राम


जिल्हा संयोजक समितिपदावर इंजि. रूपचंद रामटेके, आय. एल. नंदागवळी, सदानंद धारगावे,  सूर्यकांत हुमणे, रत्नमालाताई वैद्य, भावेश कोटांगले, गोपाल सेलोकर, हिवराज उके, जयेंद्र देशपांडे, संजीव भांबोरे,तालुका निमंत्रक समिती म्हणून भंडारा तालुका - श्रीराम बोरकर, ज्ञानेश्वर गजभिये, सी. डी गवरे,विलास नागदेवे, पवनी तालुका - खुशाल गजभिये, लाखनी तालुका - शाहीर अंबादासजी नागदेवे, भागवत मेश्राम, दिनेश वासनिक मूलचंद मेश्राम, लाखांदूर तालुका संदीप मोटघरे, बबन गजभिये, तुमसर तालुका - मोरेश्वर गजभिये या सर्वांची निवड करण्यात आली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !