तहसीलदाराचे आदेशाला उपविभागीय अधिकाऱ्याचा स्टे. ★ नायब तहसीलदार शामराव शेंडे यांचेवर कार्यवाहीची पत्रकार परिषदेत मागणी.

तहसीलदाराचे आदेशाला उपविभागीय अधिकाऱ्याचा स्टे.


★ नायब तहसीलदार शामराव शेंडे यांचेवर कार्यवाहीची पत्रकार परिषदेत मागणी.


★  प्रकरण पळसगाव येथील शेतातील रस्त्याचे.

 

नरेंद्र  मेश्राम - जि.प्र.भंडारा


भंडारा : राजस्व मामला क्रमांक ०४ बी.एम.डी.५४/२०२३ दिनांक १५/०६/२०२३ रोजी नायब तहसीलदार  शामराव शेंडे यांनी अर्जदार परसराम भेंडारकर व इतर शेतकरी यांचेकडून अर्थकारण करून अधिकाराचा गैरवापर केला व चुकीचा आदेश पारित केल्याने सामाजिक संघटनांचे वतीने कैलास गेडाम यांचे नेतृत्वात उपविभागीय महसूल अधिकारी गौरव इंगोले यांना निवेदन देताच ११ जुलै चे अंकात वृत्त प्रकाशित होताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. 


त्याच बरोबर १० जुलै ला अन्यायग्रस्त शेतकरी मनोहर बारसागडे यांनी मा . उपविभागीय महसूल अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली होती या अपिलावर मा. उपविभागीय महसूल अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५६ अन्वये पत्र क्रमांक ४२८/२०२३ दिनांक १२/०७/२०२३ अन्वये स्टे दिला आहे. 


राजस्व मामला क्रमांक ०४/बी.एम.डी.५४ चे अर्जदार परसराम भेंडारकर व इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार साकोली यांचेकडे गट क्रमांक ५२८, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६ या शेतजमिनीत गट क्रमांक ४७७ व ४७८ वसंत वालोदे यांच्या मालकीच्या शेतातून मागील ४० ते ५० वर्षापासून येण्या-जाण्याचा परंपरागत रस्ता असताना दूषित भावना ठेवून मनोहर बारसागडे यांचे गट क्रमांक ४६९ मधून रस्ता मागणीसाठी अर्ज केला होता. तत्कालीन तहसीलदार गौरव इंगोले यांनी मौका चौकशी करून परंपरागत पद्धतीने सुरू असलेला रस्ता देण्याच्या नायब तहसीलदार शामराव  शेंडे यांना सूचना दिल्या होत्या. 


पण नायब तहसीलदार शामराव  शेंडे यांनी गट क्रमांक ४७७ व ४७८ चे मालक वसंत वालोदे यांचे बयान न नोंदविता मंडळ अधिकारी यांच्या अहवालाची नोंद दाखवून परसराम भेंडारकर व इतर शेतकऱ्यांशी अर्थकारण व अधिकाराचा गैरवापर करून मनोहर बारसागडे व इतर शेतकऱ्यांना घातक होईल. असा आदेश पारित केला असे निवेदनात नमूद आहे. 


 १५ जून २०२३ चे पारित आदेशाप्रमाणे रस्ता मिळाल्यास मनोहर बारसागडे यांना आपले मत मांडण्याची संधी न देता घाईघाई ने गट क्रमांक ४६९ मधील काही बांध्याचे धुरे फोडून रस्ता बनवून शेतीचे नुकसान केले. तसेच त्यांना मानसिक त्रास देण्याचे उद्देशाने रस्त्यास आडकाठी करीत असल्याची पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी मनोहर बारसागडे यांनी १५ जून चे आदेशाविरुद्ध उपविभागीय महसूल अधिकारी गौरव इंगोले यांचेकडे अपील दाखल करून चुकीचे आदेश पारित करणाऱ्या नायब तहसीलदार शेंडे यांचेवर कारवाई करावी. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व समता सैनिक दलाचे वतीने कैलास गेडाम यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आल्याचे  महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. 


नायब तहसीलदार शेंडे यांनी १५ जून २०२३ रोजी पारित केलेला आदेश उपविभागीय महसूल अधिकारी गौरव इंगोले यांनी दोंन्ही पक्षाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ नये. या करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५६ अन्वये सदर आदेशाविरुद्ध पुढील आदेश येई पर्यंत स्टे दिला असला तरी नायब तहसीलदार श्यामराव शेंडे यांचेवर कारवाई करावी.अशी मागणी पत्रकार परिषदेत कैलास गेडाम,डी.वाय.बडोले,सोनू राऊत,भोला राऊत,चिरंजीव बारसागडे,सुरेश मेश्राम, प्रमोद शिंगाडे यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !