नागभीड जिल्हा निर्मिती साठी तहसील कार्यालयावर भव्य विशाल मोर्चा व नागभीड बंद.

नागभीड जिल्हा निर्मिती साठी तहसील कार्यालयावर भव्य विशाल मोर्चा व नागभीड बंद.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


नागभीड : आज दिनांक 20/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित केला होता.तसेच नागभीड कड़कड़ित पूर्णपणे बंद होता.नागभीड जिल्हा होण्यासाठी सर्वपक्षीय, सर्वसामाजिक संघटना, सर्व पतसंस्था, शिक्षक संघटना, तसेच सर्व नागभीडकर एकत्र येऊन संघर्ष समिती बविण्यात आली.

या मोर्चाचा विशेष म्हणजे मोर्चामध्ये बैलबंडी, दिंडीभजन,महिला,पुरुष,युवक,अपंग,शिक्षक, व्यापारी वर्ग,तसेच सर्वजातीधर्माचे लोक एकत्र येऊन विशाल अशा नागभीडकरांचा रूप घेतला या मोर्चामुळे झोपलेले प्रशासन जागे होईल.

तसेच भौगोलिक दृष्टीनुसार नागभीड सोईस्कार आहे.याबद्द्ल सगळ्यांना माहिती आहे.तसेच अनेक जिल्हासमिती सदस्यानी लोकांना सम्बोधित करताना आपली लढाई जिल्हा बनेपर्यंत सुरु राहीन असे संबोधले.यासाठी आज प्रशासनाला तहसील कार्यलय येथे निवेदन देण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !