वन रक्षक कर्मचाऱ्यावरील हल्याचा विविध संघटने कडून निषेध करून कार्यवाहीची मागणी.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : भंडारा वनविभात कार्यरत असलेल्या वनाधिकारी, वनकर्मचारी संघटनां ,फाॅरेस्ट रेंजर्स असोसिएशन महाराष्ट्र ,सेवानिवृत्त वनाधिकारी, वनकर्मचारी संघटना , महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना नागपूर ,महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर,वनकर्मचारी, वनमजूर संघटना भंडारा यांची संयुक्त बैठक विभागीय कार्यालय कॅम्पहाऊस भंडारा येथे घेण्यात आली.
त्यामध्ये दिनांक 28 जुन रोजी पवनी वनक्षेत्रातील मौजा खातखेडा,येथे वन्यप्राणी वाघाचे बंदोबस्तासाठी घटनास्थळी गेलेल्या वनाधिकारी, वनकर्मचारी यांच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला करुन बेदम मारहाण केली. त्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आले. सदर घटनेतील आरोपी विरोधात दिनांक 28जुन रोजी FIR दाखल करण्यात आली असून आज पर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही त्याबाबत लढा देण्यासाठी वरिल संघटनांची संयुक्त कृती समिती गठीत करण्यात आली आहे.
संयुक्त कृती समिती मार्फत उपवनसंरक्षक राहुल गवई भंडारा विभाग यांची भेट घेऊन सदर घटनेतील आरोपींना अटक करणेबाबत आपल्या स्तरावरून पाठपुरावा करण्याबाबत निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी उपवनसंरक्षक यांनी घटनेच्या तारखेपासून सतत पाठपुरावा सुरू असुन सदर प्रकरणी सर्वोतोपरी मदत करण्याची हमी दिली गेली.
आरोपींना तात्काळ अटक करणेबाबत पोलिस अधिक्षक यांचे वतीने अप्पर पोलीस अधीक्षक भंडाराचे कातकडे यांना निवेदन दिले. सदर प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षकानी तपासी अधिकारी यांना मोबाईल काॅल करुन वरिल प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या.
तसेच जिल्हाधिकारी योगेश कुभेजकर यांना सदर प्रकरणी लक्ष देवुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस विभागाला देण्यात येतील असे सांगितले.
सदर घटनेतील आरोपींना 02 दिवसांच्या आत अटक झाली नाही तर संयुक्त कृती समिती च्या नेतृत्वात दिनांक 03 जुलै पासुन भंडारा वनविभागातील सर्व वनकर्मचारी धरणे आंदोलन करतील असा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे संयुक्त कृती समीतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.