सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपुजन.

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भुमिपुजन. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा  : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे जन सुविधा निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमिपुजन कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते पार पडले.  


उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, गावाचा सर्वांगीण विकास, गावातील मूलभूत सुविधा, पर्यावरण मुक्त गाव, स्मार्ट ग्राम करण्याकरता प्रयत्न आपण करू तसेच अशा अनेक विकासात्मक गोष्टी राबवून गाव स्वच्छ व सुंदर व हिरवगार करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न असेल. त्याचबरोबर गावातील सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न असेल. एकच ध्यास गावचा विकास या ब्रीद वाक्यप्रमाने काम करण्याचा प्रयत्न राहील यात सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. 


या प्रसंगी कौशल्य कावळे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे,दिपक झाडे,सुनिता उमाटे रंजना पिंगे, माजी उपसरपंच महादेव ताजणे, जेष्ठ नागरिक महादेव पाटील पिंगे, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, महादेव वाढई, पुंडलिक पिंगे, पुंडलिक मेश्राम, कवडु पिंगे, अमोल कावळे,मदन पाटील वाढई, सुरेश चौधरी ग्रामसेवक नारनवरे राजेंद्र उमाटे मारुती विददे, रामचंद्र खाडे शुभम उमाटे श्रावण गेडाम ओमकार आसवले तानेबाई सपाट मंगला पेटकर, कामिना उमाटे ,संगीता ताजने, लता क्षीरसागर ,साळवे बाई,विददे बाई, शिपाई सुनील मेश्राम विशाल नागोसे व समस्त गावकरी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !