लाईड मेटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर च्या हस्ते शास.औ.प्र.संस्थेत वृक्षारोपण संपन्न
एस.के.24 तास
चंद्रपूर : लॉईड मेटल्स एन्ड एनर्जी लिमिटेड च्या वतीने नुकतीच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली.तसेच संस्थेत सुरू असलेले प्रशिक्षण, उपलब्ध इन्फ्रास्टक्चर याबाबत माहिती घेतली. या भेटी निमित्ताने संस्थेच्या आवारात लाईड मेटलचे मॅनेजींग डायरेक्टर श्री . मधुर गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते . तर याप्रसंगी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक सौ. सुचिता गभणे आदींची उपस्थिती होती. श्री. गुप्ता यांनी संस्थेच्या विविध व्यवसाय विभागाची पाहणी करून संस्थेत शिकवण्यात येणारे अभ्यासक्रम व उपलब्ध सोयीसुविधा बाबतीत माहिती घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय घटे,अनिल भोगेकर,नितीन तिरणकर,नितू लोनगाडगे,सचिन भोंगळे ,कु. रिया पिपरीकर,अभिषेक बुलबुले, विशाल मडावी, संजीव रामटेके,विश्वास सुर्तीकर,मयुरी पाझारे, विशाखा ढोके, प्रणाली कारमोरे,वैशाली साव,सुनिता तोडासे, दीपा निंदेकर,अनुप मांदाळे,मृणाली मांढरे ,श्रुतिका निखाडे,भुपेश शेंडे,तुषार भाकरे आदींनी अथक परिश्रम घेतले.