मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढणा-या नराधमांना फाशिची शिक्षा द्या. ★ तहसिल कार्यालय,आरमोरी समोर तिव्र निदर्शने करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी

मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढणा-या नराधमांना फाशिची शिक्षा द्या.


★ तहसिल कार्यालय,आरमोरी समोर तिव्र निदर्शने करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


आरमोरी : मणिपूर मध्ये कुकी या आदिवासी समुहातील महिलांची विवस्त्र धिंड काढणा-या नराधमांना फाशिची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतिने येथिल तहसिल कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसिलदार यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतिने आरमोरी तहसिल कार्यालयासमोर मणिपूर येथिल घटणेचा तिव्र शब्दात निषेध करून केंद्रातील व मणिपूर  राज्यातील बिजेपी सरकार विरूध्द जोरदार नारेबाजी करून कुकी या आदिवासी समाजाला केंद्र सरकार न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे त्यामूळे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशिही मागणी करण्यात आली, केंद्र सरकारचे धोरण हे  महिला विरोधी असून येणा-या काळात देशातील महिला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे यांनी केले.


पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर येथे मैतेई, कुकी आणि नागा व ईतर आदिवासीमध्ये जमातीमध्ये गेल्या दोन महिण्यापासून संघर्ष सुरू आहे, हा संघर्ष आता दंगल, जाळपोळ आणि नरसंहारापर्यंत पोहोचला आहे, मैतेई पुरुषांच्या हिंस्त्र जमावाने विवस्त्र करून त्याच्या नग्न देहाची विटंबना करण्यात आली हि घटणा पोलिसांच्या समक्ष घडूनही पोलिसांनी त्यावर कोणतिही एक्शन घेतली नाही,एफआयआर सुध्दा दाखल केले नाही, महिलांवर झालेला अत्त्याचार हा अत्यंत निंदणीय आहे, या अमानवीय कृत्याचा तिव्र शब्दात निषेध करण्यात येत असून तात्काळ अमानविय कृत्य करणा-यांना फाशिची शिक्षा देण्यात यावी अशिही मागणी करण्यात आली आहे.


तिव्र निदर्शने आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष,प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी विकास भैसारे उपाध्यक्ष, विनोद लांजिकर, शुभम गजभिये, पुष्पा रामटेके, संध्या रामटेके, वैशाली रामटेके, चंद्रकला शेंडे, सुनीता तागवान,लता बरसागडे, कुमता मेश्राम, सरिता बुल्ले, पायल सहारे, अपर्णा मेश्राम, डॉ. कल्याणी उंदीरवाडे,शिला उसेंडी आदि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोछ्या संख्येने उपस्थित होत्या.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !