भाऊंची पाऊले वळली पऱ्ह्यांकडे...
निराशाच्या डोहातील शेतकऱ्यांना मदतीची गरज. - प्रा.अतुलभाऊ देशकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०५/०७/२३ दिनांक चार जुलै... दिवस मंगळवार... आज तीन गावी भूमिपूजन चा कार्यक्रम.... नियोजित वेळेनुसार सर्व सूरू होत.आक्सापूर आणि पवनपार येथील जन सुविधा अंतर्गत मंजूर स्मशानभूमीत सभामंचाचे बांधकामाची भूमिपूजनाचा कार्यक्रम आटवून परतत असताना.....
अचानक भाऊंची पाऊले वळली त्या रखरखत्या उन्हात पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पर्ह्यांकडे . भाऊंनी क्षणाचाही विचार न करता आसपासच्या पऱ्ह्यांची पाहणी केली. आणि पावसाअभावी पऱ्ह्यांची कशी दैन्यावस्था झाली आहे.या विचारापेक्षाही माझ्या शेतकरी बांधवांची काय दयनीय अवस्था झाली आहे. या विचाराने भाऊ भावनीक झाले. "काहीतरी करावंच लागेल नाहीतर माझा शेतकरी बांधव कोलमडून गेल्याशिवाय राहणार नाही "!
असा निर्धारपूर्वक विचार करून भाऊ पुढच्या वाटचालीस निघाले.
या प्रसंगी भाजपाचे तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल महादेव दोनाडकर,भाजपा ओबीसी मोर्चा ब्रम्हपूरी तालुकाध्यक्ष प्रेमलाल धोटे,भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरीचे शहराध्यक्ष प्रा.डॉ अशोक सालोटकर,भाजपा महामंत्री ज्ञानेश्वर दिवटे, भाजपा जिल्हा पदाधिकारी ज्ञानेश्वर भोयर, भाजपा अनुसूचित जाती जिल्हा पदाधिकारी चुमदेव जांभुळकर,भाजपा कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष विलास भाऊ वाकुडकर, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश्वर जी मंगरे, उपस्थित होते.