सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यावर कार्यवाही करा. - सविधान सघंर्ष समिती भंडारा
नरेंद्र मेश्राम
भंडारा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान जनक व बदनामीकारक पोस्ट प्रसारित क रणाऱ्या आरोपी विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्या साठी संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याचे वतीने करण्यात आली.
ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील वंचित उपेक्षित बहुजन समाजाचा लढा उभारून प्रत्येक घटकांना न्याय व अधिकार मिळवून देण्याकरिता अविरत संघर्ष केला व भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना समता स्वतंत्र न्याय बंधुत्व संविधानात प्रदान केले अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गैर अर्जदाराने बजरंग दल ग्रुप सातोना येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान जनक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांचे चरित्र व व्यक्तिमत्व मलिन करण्याचा प्रयत्न केला व जगातील एका विद्वानाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा नियोजित प्रकार केला आहे.
या युवकाने याआधी देखील अशाच प्रकारे वादग्रस्त मेसेज केले होते तेव्हा देखील त्याला पोलीस अधीक्षक भंडारा यांनी समजाविले होते.या प्रकरणाची सखोल व योग्य चौकशी करून या प्रकारातील गैरहर्जदार तथा ग्रुप ॲडमिन व इतर दोषींवर ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व गुगलवर असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची अपमान जनक, बदनामकारक पोस्ट तातडीने हटवण्यात यावी अशी मागणी संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर महासचिव शशिकांत भोयर कार्याध्यक्ष अचल मेश्राम, कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्ने, आर बी धारगावे, ज्ञानेश्वर गजभिये, नित्यानंद मेश्राम, योगीराज धारगावे, डी पी ढगे, समता सैनिक दलाचे श्रीराम बोरकर, सदानंद धारगावे, यांनी राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत निवेदन देवून मागणी केली आहे.
तसेच माननीय नामदार अमित शहा गृहमंत्री भारत सरकार, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार, देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,यांना सदर निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.