कळमना येथे सवारी बंगल्याचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते लोकार्पण.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : तालुक्यातील मौजा कळमना येथे सवारी बंगल्याच्या बांधकाम पुर्ण होऊन या विकासकामाचे लोकार्पण कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. वाढई म्हणाले की, विविधतेत एकता, सर्व धर्म समभाव या तत्त्वावर विश्वास ठेवून, भारतीय लोकशाही व लोकसंस्कृती ची जोपासना करण्याच्या दृष्टीने गावातील अनेक विकासकामांप्रमाणेच सवारी बंगल्याचे बांधकाम करण्यात आले आहे निश्चितपणे याचा लाभ स्थानिक मुस्लिम समाज बांधवांना व ग्रामस्थांना होईल.अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी तमुस अध्यक्ष निलेश वाढई,प्रभाकर साळवे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, शामराव चापले, ऋषी उमाटे, विलास चनकापुरे,बापुजी वाढई,शेख बाबु, मारोती चिंचोलकर,गजानन उमाटे,महेश दिवसे राजु भोयर, जिजाबाई चिंचोलकर,ललिता चनकापुरे,रेखा चनकापुरे,महादेव आबिलकर,प्रविण वाढई,दत्तु कुकुडे व समस्त गावकरी उपस्थित होते.