घोसरी - लालहेटी शेत शिवारात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला.


घोसरी - लालहेटी शेत शिवारात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


चंद्रपूर : दिनांक,19/7 /2023 रोजी 12.00.वा.च्या सुमारास घडली.सविस्तर वृत्त असे की नांदगाव येथील मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात होते.रात्र झोपेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने सौं.वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला असता बाजूला झोपेत असलेल्या पती,सुरेश दूरकीवार व मुलगा पंकज दूरकीवार यांनी महिलेला वाचवण्यासाठी वाघाशी झुंज दिली परंतु कुटुंबातील तिघेही जखमी झाले, त्या कुटुंबाच्या मेंढ्या वाघाच्या दहशतीने सैरावैरा झाल्या, सदर घटनेची माहिती क्षेत्र साहेब घोसरी यांना देण्यात आली रात्र पथक रवाना करून त्या जखमींना चंद्रपूर येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.


सध्या त्यांची प्रकृती धोक्या बाहेर आहे.घोसरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,सध्या शेतीचे काम असल्यामुळे जंगला लगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतावर जावे कसे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी अशी घोसरी लालहेटी येतील नागरिकाकडून मागणी करण्यात आली आहे.बळीराजाच्या पाठीशी प्रशासन धावून येणार का ?वाघाला पकडून जेरबंद करावा अशी मागणी कुरमार / धनगर समाज करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !