धावत्या बस चे छत हवेत उडताना ; राज्य परिवहन महामंडळ चा बस देखभाली वर दुर्लक्ष. ★ प्रवाशांनच्या जिवाला धोका.

धावत्या बस चे छत हवेत उडताना ; राज्य परिवहन महामंडळ चा बस देखभाली वर दुर्लक्ष.


प्रवाशांनच्या जिवाला धोका.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : राज्यातील शेवटच्या टोकावरील,दुर्गम जिल्ह्यात आधीच दळणवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसची अवस्था दयनीय आहे. गडचिरोली अहेरी या बसचे छत चक्क हवेत उडाल्याची चित्रफित व्हायरल झाली अन् यानिमित्ताने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दयनीय अवस्थाही चव्हाट्यावर आली. अहेरी, भामरागड, अतिदुर्गम तालुक्यांत पावसाळ्यात एसटी बसेसच्या छत गळतीची तक्रार नित्याचीच आहे. काहीवेळा बसमध्ये बिघाडही होतो.


 त्यामुळे २६ जुलैला समाज माध्यमात एटापल्ली, सिरोंचा या दुर्गम,प्रवाशांना घनदाट जंगलात अडकून पडावे लागते. मात्र, २६ जुलैला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गडचिरोलीहून अहेरीला निघालेल्या एसटी बसचे छत हवेत उडाले. अर्धवट तुटलेले हे छत हवेत भिरभिरतच चालकाने बस नेली. चामोर्शी रोडवर हा प्रकार घडला. तब्बल सहा किलोमीटरपर्यंत एसटीचे छत एका बाजूने हवेत उडाल्याचा हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. यानिमित्ताने कालबाह्य झालेल्या व दर्जाहीन एसटी बसेस सामान्य प्रवाशांच्या माथी मारल्या जात असल्याचे वास्तव समोर आले. यासंदर्भात अहेरीच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क होऊ शकला नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !