अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस स्टेशन मुल व चिरोली पोलीस चौकी ला संपर्क करण्याचे आवाहन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दिनांक,24/07/2023 ला एक अनोळखी पुरुष वय अदांजे 37 वर्ष असून मृत अवस्थेत आढळून आला.केळझर ते टोलेवाही रेल्वे च्या मधोमध पटरी वरून तो पायदळ जात असताना त्याला रेल्वे ची धडक बसली त्यामुळे जागीच ठार झाला.
त्याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू पावला.पोलीस स्टेशन मुल मर्ग क्रं.55/23 कलम 174 जि.पो. चा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस स्टेशन मुल चे निरीक्षक,परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस चौकी चिरोली कर्मचारी,स.फौ.अकबर खा पठाण,सुरेश ज्ञानबोनवार,मृतदेह पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय मुल येथे ठेवण्यात आले.
अनोळखी मृत पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता.शोध न लागल्याने उपयुक्त माहिती मिळून आली नाही.सदर मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन,मुल पोलीस स्टेशन मार्फत व पोलीस चौकी चिरोली करण्यात येत आहे.
अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे : -
वय अंदाजे 37 वर्ष,केस काळेदाढी मिशी पाढंरी,अंगात पांढऱ्या निळी पट्टी गोल गळ्याची रेषा असलेली टी शर्ट,व काळ्या रंगाचा फुल नाईट पॅन्ट परिधान केलेला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.