मुल एम.आय.डी.सी.जवळ ट्रॅव्हल्स चा अपघात.
नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : दिनांक 15 /7/23 चा मध्यरात्री 12 वाजता चा दरम्यान गडचिरोली चंद्रपुर महामार्गावर मूल नजीक MIDC. पाँईट जवळ घडला.
सविस्तर वृत्त असे की रायपूर वरुन हैदराबाद ला 40 ते 45 मजुर प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जाणारी स्लिपर कोच टायगर कंपनी ची ट्रॅव्हल्स चा चालकाचे ट्रॅव्हल्स वरुन नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगाने असल्याने रस्त्याचा कडेला शेतात जाऊन पलटली. जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास त्यांनी धाव घेतली.
मुल पोलिस स्टेशन ला माहिती दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुल पोलिस ताबडतोब घटना स्थळावर दाखल झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले वेळीच मदत मिळाल्याने या अपघातात जिवित हाणी झालेलि नसली तरी काही प्रवाशी जखमी आहेत.