मोहोर्ली मो.शाळेत शाळापूर्वतयारी मेळावा संपन्न.

मोहोर्ली मो.शाळेत शाळापूर्वतयारी मेळावा संपन्न.


सुरेश कन्नमवार - एस.के.24 तास


जि.प.प्राथ शाळा मोहोर्ली मो.येथे शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला.अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा स्वाती कुसराम होत्या.प्रमुख पाहुणे प्रथम फाउंडेशनचे तालुका समन्वयक वाकडे व चौधरी होते. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,प्रगती भगत, पुष्पा चौधरी, रुंता पोटे, शारदा गुरनुले माधुरी कुलसंगे व ग्रा.पं.सदस्या दुशीलाताई झरकर उपस्थित होते.सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. मुलांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. 

मुलांला सक्षम करण्यामध्ये आईची गरज महत्वाची आहे. भरतीपात्र मुलांची इयत्ता 1 ली ची आपण तयारी करून घेऊ शकतो. त्यामुळे भविष्यकालीन शिक्षणाचा पाया घातला जाईल असे प्रतिपादन मान्यवरांनी केले, कार्यक्रमात सात स्टॉल लावण्यात आले व कृती घेण्यात आले व मातांना घरी शिकवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.अंगणवाडी सेविका प्रभाती चौधरी,संगीता बोमनवार,गावातील स्वयंसेवक यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक मु.अ.मारोती आरेवार यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !