वन कर्मचारी रोपवाटिकेतच दारू पिऊन तर्रर्र ; दोघे निलंबित.

वन कर्मचारी रोपवाटिकेतच दारू पिऊन तर्रर्र ; दोघे निलंबित.


एस.के.24 तास


कोरची : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात वन कर्मचारीच दारू पिऊन तर्रर्र असल्याचे आढळले. विशेष म्हणजे कर्तव्यावरच रोपवाटिकेत त्यांनी मद्यपान केल्याचे उघड झाले. त्यानंतर उपवनसंरक्षकांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.दि. १२ जूनला बेडगाव (ता. कोरची) वनपरिक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.अजय गहाणे व बबलू वाघाडे अशी त्या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत.गहाणे हा क्षेत्रसहायक आहे,तर वाघाडे वनरक्षक म्हणून काम करतो. 


बेडगाव वनपरिक्षेत्रांतर्गत मोहगाव रोपवाटिकेत ते दोघे ऑन ड्युटी तर्रर्र होते.रोपवाटिकेत रोपे नेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्याची माहिती आहे.त्यानंतर नागरिकांनीच त्याचे मोबाइलमध्ये चित्रण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना धाडले.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात तथ्य आढळल्याने अखेर उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दि.१२ जुलै रोजी त्या दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. कारवाईने बेशिस्तीला दणका बसला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !