" त्या " वाघिणीचा चित्तरंजक थरार.
नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : बुधवारच्या रात्री.१२ वाजताची घटना ; वाघिण व मेंढपाळ कुटुंबाच्या झुंजीत वाघिणीवर प्रतिहल्ला चढवून वाघीणीला परतावून लावत कुटुंबातील तिघांनी केला आपला बच्चाव ; कुटुंबातील तीघेही जखमी.
★ गुरूवारच्या सकाळी 5.00.वा. घटना येसगाव येथील शेतकरी गणेश भाऊजी सोनूले वय (३७)हा हातात पावडा व कुराड घेऊन शेतात निघाला असता रस्त्यालगत भंजाळी गावाजवळ गणेशवर वाघिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु गणेशच्या हातात कुराड असल्याने तत्परता दाखवून वाघिणीला झुंज देत परतावून लावला.यात गणेश जखमी झाला.
गुरुवारच्या दुपारी 1.00 वा.ची घटना ; बेंबाळ परिसरातील शिवारात म्हशींच्या कडपात वाघिण घुसली.शिकार म्हणून म्हशींवर हल्ला करण्याच्या हेतूने.मात्र म्हशींच्या एकीच्या बळाने वाघिणीला झुंज देत म्हशींने वाघिणीला जखमी केल्याचा थरार लोकांनी अनुभवला. *म्हशी व वाघीनीची थरारक झुंज चित्तरंजक* होती.अनेकांनी हा थरार कॅमेऱ्यात कैद केला.
★ तिन्ही घटनेनंतर जंगलाच्या राणीची थरारक झुंज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
★ अखेर ती वाघिण जखमी अवस्थेत झुडपाजवळ निपचीत पडून स्वताच्या मृत्यूची झुंज संपवली.
★ शुक्रवार सकाळी ११ वाजता ; मृत्यू वाघिणीच्या चंद्रपूर वाघ्र उपचार केंद्रात सकाळी 11.00 वा. शवविच्छेदन करण्यात येणार आहे.