आज धनगर आरक्षण याचिकेची सुनावणी.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुंबई : धनगर समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गांतर्गत आरक्षण द्या,अशी मागणी करणाऱ्या आणि याला विरोध करणाऱ्या याचिकांची गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे.न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ.नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ती होणार असून साऱ्या धनगर समाजाचे या याचिकेकडे लक्ष लागून आहे.
धनगड म्हणजेच धनगर असे जाहीर करावे. धनगर समाजाला भटक्या जमातीचे (एनटी) आरक्षण नको तर त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत (एसटी) करावा, अशी मागणी करणारी याचिका भारत अगेन्स्ट करप्शन संघटना व महाराष्ट्र अहिल्याबाई समाज प्रबोधिनी मंच या दोन संघटनांसह अन्य दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.तर न्यायालयाच्या निर्देशानंतर या याचिकांना विरोध करत वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने अँड.गार्गी वारुंजीकर यांच्यासह अन्य दोघांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.
गेली सहा वर्षे प्रलंबित असलेल्या याचिकांवर अखेर न्यायमूर्ती गौल्य पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने मागील ' सुनावणीच्या वेळी गेल्या सहा वर्षांत दाखल केलेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार गुरुवार,१३ आणि शुक्रवार,१४ जुलै असे सलग दोन दिवस दुपारी २.३० वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे.