बसपा बल्लारपुर विधानसभेचे कार्यकर्ता सम्मेलन व समिक्षा बैठक संपन्न.
एस.के.24 तास
मुल : बसपाच्या गांव चलो अभियाना अंतर्गत बल्लारपुर विधानसभेतील गांव निहाय सेक्टर व बुथ बांधणी चा संघटनात्मक समिक्षा आढावा तथा भव्य कार्यकर्ता सम्मेलन दि.10 जुलै 2023 रोजी पत्रकार भवन, मूल येथे विधानसभा , सेक्टर, बुथ च्या शेकडो कार्यकर्त्यांच्या ऊपस्थितीत पार पडला.
प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रभारी भिमजी राजभर साहेब, सुनिल डोंगरे साहेब यांनी पक्षाची वाटचाल आणि 2024 च्या निवडणुकाची तयारी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष.मुक्कदर मेश्राम व माजी जिल्हाध्यक्ष, हंसराजभाऊ कुंभारे यांनी मनोगत व्यक्त केले.
विशेष ऊपस्थितीमध्ये प्रा.गुलाब मोरे,प्रा. जनबंधु, डाॅ.गजानन चौधरी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ .वशिष्ट वाकडे यांनी तर प्रास्ताविक डाॅ.शांतीकुमार गेडाम आणि आभार रेवनाथ वालदे सर यांनी मानले.