समाजकंटक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात मुल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल.
★ विविध पुरोगामी संघटनेची मागणी.
नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : महाराष्ट्र हा प्रगतशील पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात सर्व जाती-धर्म व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने मिसळून राहतात आपल्या राज्याला थोर महापुरुषांचा वारसा लाभलेला आहे त्यातच महात्मा ज्योतिराव फुले बहुसंख्य लोकांचे आदर्श असून त्यांना मानणारा बहुसंख्य समाज महाराष्ट्रात वास्तव्यास आहे.
महाराष्ट्र मध्ये काही दिवसापासून महापुरुषांच्या बदनामीचा जणू ठेकाच घेतल्याप्रमाणे संभाजी भिडे नावाचा माणूस सारखा महापुरुषांबद्दल अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून सारखं अवमान करीत आहे काही दिवसा अगोदर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी त्यांनी गरड ओकली होती त्यानंतरच आता भारतीय समाज सुधारक राजा मोहन रॉय व महाराष्ट्रात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी अत्यंत खालच्या शब्दांमध्ये आक्षेपार्ह विधाने करुन महापुरुषांचा अवमान केलेला आहे त्यामुळे त्यांना मानणारा महाराष्ट्रातील बहुसंख्य वर्गाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा काम केल्या जात आहे.
त्यामुळे अशा प्रवृत्तीला व मानसिकतेला लगेच आटोक्यात आणणे गरजेचे आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आपणास विनंती आहे की संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी वर गुन्हा दर्जा करून त्वरित अटक करण्यात यावी तसे न झाल्यास महाराष्ट्रातील तमाम बहुसंख्य वर्ग रस्त्यावरून त्या विरुद्ध मोठें आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.
याप्रसंगी भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ. राकेश गावतुरे समता परिषदेचे प्रा. विजय लोणबले ज्येष्ठ नेते प्रा. रामभाऊ महाडोळे शशिकलाताई गावतुरे,देवराव ढवस गंगाधर कुनघाळकर डॉक्टर पद्माकर लेनगुरे राकेश मोहूर्ले डेव्हिड खोब्रागडे मनीष मोहूर्ले,मोरे सर,ओमदेव मोहूर्ले, ईश्वर लोणबले ,मनोज मोहरले ,रोहिदास वाढई,नितेश मॅकलवार, प्रतिक गुरूनूले ,पवन गुरूनूले,मंगेश मोहुले,प्रतिक आसमवार यांनी सहभाग नोंदविला.