सेवानिवृत्ती शिक्षकांना रिक्त पदावर जिल्हा परिषद शाळेत घेण्याचे परिपत्रक मागे घ्या. - दिनेश वासनिक्
नरेंद्र मेश्राम
भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ७ जुलै 2023 ला परिपत्रक काढून महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये असलेल्या रिक्त पदांवर जे सेवानिवृत्त शिक्षक झाले त्यांनाच पुन्हा वयाच्या 70 वर्षापर्यंत शासनाने 20000 रुपये मानधनावर करार पद्धतीवर येत्या पंधरा दिवसात सामावून घेण्याच्या जो निर्णय घेतला हा निर्णय महाराष्ट्रातील बेरोजगारातील निंदा करणारा आणि हास्यास्पद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासनिक् यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात गावोगावात अनेक सुशिक्षित बेरोजगार पदवी घेऊन रोजगाराच्या शोधात आहेत आणि अशा परिस्थितीत शासन सुशिक्षित बेरोजगाराला डावलून सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असेल तर ही एक हास्यास्पद बाब आहे.शासनाने या बाबीचा पुनर्विचार करून सुशिक्षित बेरोजगारांना 15000 हजार रुपये जरी दिले तरी ते विद्याधानाचे काम करू शकतात.
एवढे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात डीएड बीएड एम एड झालेले आहेत .म्हणून शासनाने त्यांच्या जीवनाशी खेळणे बंद करावे व त्यांना न्याय देऊन जिल्हा परिषद शाळेत रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी दिनेश वासनिक् यानी केली.