" लोकसंख्या वाढ विकासाच्या आड "- प्रा.विजय मुडे त्यांचे प्रतिपादन

 


" लोकसंख्या वाढ विकासाच्या आड "- प्रा.विजय मुडे त्यांचे प्रतिपादन


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,१३/०७/२३ नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे लोकसंख्या शिक्षण मंडळ, महिला अध्ययन सेवा केंद्र,राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 जुलै 2023 रोजी 'जागतिक लोकसंख्या दिन' व 'स्मार्ट व डिजिटल टीव्हीचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 


याप्रसंगी हितवाद वर्तमानपत्राचे वार्ताहर प्रा. विजय एस. मुडे यांनी "लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम भविष्यकाळात माणसाचे सुख हिरावून घेईल.. आजच्या काळात लोकसंख्या वाढ, विकासाच्या आड येत आहे. त्यामुळे वेळेच जागी होणे गरजेचे आहे, असे मत  त्यांनी  मांडले. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य डी एच. गहाणे उपस्थित होते. याप्रसंगी स्मार्ट व डिजिटल टीव्हीचे  उद्घाटन ने. भै. हि. शिक्षणसंस्थेचे सचिव माननीय श्री.अशोकजी भैया यांच्या हस्ते करण्यात आले,तर कार्य.प्राचार्य डॉ.डी एच गहाणे यांनी "आजच्या काळात लोकसंख्या वाढ तारक व मारक कशी?" ते विद्यार्थ्यांना समजावून दिले. याप्रसंगी लक्ष्मण ठाकरे, प्राची इनकने, मंगेश जराते, रोहित दिघोरे, जयश्री सतारे हा प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच नुकतेच पीएचडी प्राप्त झालेल्या प्रा. वर्षा चंदनशिवे यांचा  सत्कार करण्यात आला.


कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.  कार्यक्रमाचे संचालन  लोकसंख्या शिक्षण मंडळाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पद्माकर वानखडे  यांनी तर आभार  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रकाश वट्टी मानले. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महिला अध्ययन सेवा केंद्राचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अजीत खाजगीवाले तसेच राष्ट्रीय छात्र सेना कॅप्टन डॉ. के के गिल व अभिजीत परकरवार  यांनी प्रयत्न केले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. सुभाष शेकोकर, प्राचार्या डॉ. हर्षा कानफाडे, डॉ.धनराज खानोरकर,डॉ. भास्कर लेनगुरे,प्रा. रुपेश वाकोडीकर, प्रा. पठाडे सर,प्रा. दमकोंडवार, प्रा. आकाश मेश्राम, डॉ.सुनील चौधरी,प्रा.पराते इत्यादींनी उपस्थिती दर्शवली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !