काळ आलेला होता,पण वेळ आलेला नव्हता.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : काल दिनांक 26 जुलै रोजी सायंकाळी 4 ते 5 वा.च्या दरम्यान नेहमीप्रमाणे मेंढपाळ माझे बंधू श्री.मुखरु रामाजी पाटेवार व पुतणे अतुल हे दोघे शेळ्या मेंढ्या घेऊन पिठासूर येथील बालाजी डोंगर जुनासुर्ला आणि चांदापूर या दोन्ही गावाच्या मधील डोंगराच्या शेजारी शेळ्या मेंढ्या नेउन चारत होते.
अचानक कुत्रे भुंकायला लागल्यामुळे भाऊला वाटले लांडगे वगैरे असतील म्हणून झुडपाच्या दिशेने जाऊन बघितले,तर अगदी 20 ते 25 फूट अंतरावर असलेल्या एक भलामोठा पट्टेदार वाघ पुतणे अतुल च्या पाठमोऱ्या उभे राहून त्याच्यावर झडप घेण्यासाठी पोजिशन बनवत होता .परंतु याची कल्पना निरागस अतुल ला नव्हती.
भाऊने ही डोळ्याने बघितले परंतू पोटच्या गोळ्याच्या जीवापेक्षा वाघाचे संकट मोठे नाही हे ठरवून लगेच क्षणाचे ही विलंब न लावता त्याने मुलाचा हात पकडून दूर अंतरावर घेऊन गेले.आणि खूप जोराने ओरडू लागले त्यामुळे संपूर्ण शेळ्या मेंढ्या बाहेर चालले आल्यात काही क्षणातच वाघ झुडपातून निघाला आणि बघत बघत डोंगरावर चालला गेला हे सर्व दैव बलवत्तर म्हणून घडले यालाच म्हणतात काळ आलेला होता पण वेळ नाही.
शब्दांकन : - श्री.माणिक पाटेवार(शिक्षक) मु.जुनासुर्ला ता.मुल जिल्हा.चंद्रपूर मो.नं. 9404101258