शेतात वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू ; बेटाळा शेतशिवारातील घटना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२६/०७/२३ तालुक्यातील बेटाळा ते पारडगाव रस्त्याला लागून असलेल्या गावालगत दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात धान पिकाच्या रोवणी कामासाठी गेलेल्या महिलेवर वीज कोसळून महिला जागीच ठार झाली असल्याची घटना आज दुपारी 3 : 00 वा. च्या दरम्यान बेटाळा शेत शिवारात घडली.
गीता पुरुषोत्तम ढोंगे वय ( 38) असे मृतक महिलेचे नाव आहे.मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सध्या ब्रह्मपुरी तालुक्यात धान रोवणी व निंदन काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र गेल्या आठवडाभरापासून परिसरात मोठ्या प्रमाणात मेघगर्जना व विजांच्या कडकडाडासह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून ब्रह्मपुरी परिसरात धान रोवणी व निंदनकामाची सध्या लगबग सुरू आहे.
गिताबाई पुरुषोत्तम ढोंगे ही महिला मोलमजुरीसाठी गावातीलच दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात मजुरीवर गेली असल्याची माहिती प्राप्त झाली असून आज दुपारच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला व शेतात काम करीत असलेल्या गीता पुरुषोत्तम ढोंगे या महिलेवर वीज कोसळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती महसूल विभाग व पोलीस विभागाला देण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे.प्राप्त माहितीनुसार मृतक महिलेच्या परिवारातपती व दोन मुली आहेत.