ने.हि.विद्यालय येथे गणवेश वितरण सोहळा संपन्न ; स्व.किसनलाल भैया फाऊंडेशन चा उपक्रम.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : नेवजाबाई भैया हितकारिणी विद्यालय( मुलांची शाळा )येथील इयत्ता पाचवीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांना स्व. किसनलालजी भैय्या फाउंडेशन तर्फे गणवेश वाटपाचा समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती स्नेहलताताई भैय्या अध्यक्ष ने.ही.भैया शिक्षण संस्था ब्रह्मपुरी. व प्रमुख उपस्थिती अशोकजी भैया सचिव ने.ही शिक्षण संस्था ब्रह्मपुरी यांची होती.एड.भास्कररावजी उराडे सहसचिव ने. हि. शिक्षण संस्था ब्रह्मपुरी व ने.ही.शिक्षण संस्थेचे सदस्य श्री बजाज सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एन. रणदिवे,उपमुख्याध्यापक नाईक सर,शाळेचे पर्यवेक्षक श्री नाकाडे सर कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उत्तरोत्तर प्रगती करावी व शाळेचे नाव संपूर्ण देशात रोशन करावं असं बहुमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
तसेच वरील कार्यक्रमात शाळेचे संपूर्ण शिक्षक व शिक्षिका वृंद उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तुलेश्वरी बालपांडे व आभार श्री.वदनलवार सर यांनी मानले. सदर कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला.