पर्यावरणाच्या संतूलनाकरिता पक्ष्यांचे संवर्धन काळाची गरज. - श्री.अशोकजी भैया.

पर्यावरणाच्या संतूलनाकरिता पक्ष्यांचे संवर्धन काळाची गरज. - श्री.अशोकजी भैया.


श्री,अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२३/०७/२३ पक्षी हे पर्यावरणाचे घटक असून दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. आज अनेक पक्ष्यांच्या जाती लुप्त पावत चाललेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. याचा परीणाम मौसमी पावसावर झालेला आहे.


 या करीता पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संवर्धन होणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळेच बर्ड फिडर या संकल्पने अंतर्गत पक्षी खाद्य या उपक्रमाचे आयोजन करण्याचे मुख्य उद्देश आहे. पक्ष्यांचे संवर्धन होणे पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच पर्यावरणात इकॉलॉजीकल टिकून राहील. आणि म्हणूनन पक्ष्यांचे संवर्धन ही आज काळाची गरज आहे. असे मार्मीक विचार पक्ष्यांविषयी भूतदयावादी विचार व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या परीसरात करण्यात आले होते. 


अतीशय स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करून महाविद्यालयाने भूतदयावादी उद्देश घेऊन 'पक्षी संवर्धन बर्ड फिडर' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला ने.भै.हि.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताताई भैया,उपाध्यक्ष अॅड.प्रकाशजी भैया, संस्थेचे सचिव श्री.अशोकजी भैया, जेष्ठ सदस्य प्रा.एस. आर. बजाज,प्रा.जी.एन. केला व श्री. गौरव भैया तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, प्रभारी प्राध्यापक डॉ. एस. एम. शेकोकर, डॉ.आर. के. डांगे, डॉ. टी. के. गेडाम, डॉ. आर. एस. मेश्राम आयक्युएसी कोऑडीनेटर डॉ. के. एस. नाकतोडे, डॉ. वर्षा चंदनशिवे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश वट्टी, एन.सी.सी. ऑफीसर प्रा. अभिजीत परकरवार, प्रा. आनंद भोयर, डॉ. मोहन कापगते, अधिक्षक सौ. संगिता ठाकरे तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी संस्था सचिव श्री. अशोकजी भैया यांनी बर्ड फिडर या माध्यमातून पक्ष्यांना जीवन दान मिळेल व त्यांचे संवर्धन होईल. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांनी केले. 


तर कार्यक्रमाचे आभार डॉ. एस.एम.शेकोकर यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता प्रा.प्रफुल पराते,श्री. कोमल ठोंबरे,श्री.गोपाल करंबे,श्री.संजू मेश्राम,श्री.विकास पाटील व एन.एस.एस.व एन.सी.सी.कॅडेस यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !