निलागोंदी मोरगाव रस्त्याला आले तलावाचे स्वरूप.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : लाखनी तालुक्यातील निलागोंदी-मोरगाव या जवळपास ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे डांबरी करणाचे बांधकाम मागील १० वर्षापूर्वी करण्यात आले होते. मात्र तब्बल १० वर्षापासून या रस्त्याच्या देखभाल अथवा दुरुस्ती सबंधाने शासन प्रशासनासह बांधकाम विभागांतर्गत कोणतीच उपाय योजना करण्यात न आल्याने या रस्त्याची दुर्दशा झाल्याचा आरोप जनतेत केला जात आहे.पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रोडला तलावाचे स्वरूप आले आहे त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहेत.
सदर आरोपांतर्गत निलागोंदी-मोरगाव या रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे. प्राप्त माहिती नुसार तालुक्यातील निलागोंदी-मोरगाव या ३ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे गत १० वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले होते. मात्र पुढील काळात या रस्त्याचे दुरुस्ती काम करण्यात न आल्याने सदर रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. सदर मार्ग हा साकोली व लाखनी तालुक्याला जोडणारा मुख्य मार्ग असलातरी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर आपत्ती आल्यास पर्यायी मार्ग म्हणून याच रस्त्यांनी वाहतूक सुरळीत केली जाते त्यामुळे रस्ता त्वरित दुरुस्ती करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान रस्त्यात खड्डा की,खड्डयात रस्ता असल्याने या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांने प्रवास करने देखील धोकादायक असल्याने सदर रस्ता प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन निलागोंदी-मोरगाव या रस्ता बांधकामासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून स्थानिक लोकप्रतिनिधीनी गप्प न राहता पाठपुरावा करावे.