जग आणि जगणं बदललं की साहित्य बदलायलाच हवे.मराठी वाड्मय मंडळ उद्घाटन. - कवी हेमंत दिवटेचे प्रतिपादन.

जग आणि जगणं बदललं की साहित्य बदलायलाच हवे.मराठी वाड्मय मंडळ उद्घाटन. -  कवी हेमंत दिवटेचे प्रतिपादन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२१/०७/२३ " जागतिकीकरण म्हणजे मुक्त व्यवथा.आधी आपले जीवन ब्लॅक अँन्ड व्हाईट होते,आता कलरफुल झाले.जगात जे घडत ते चटकन माहित होते.यू ट्यूब,गुगलवर जग भेटतं पण जगावर निसर्गाचं राज्य आहे देवाचे नाही.


नदी,नाले, समुद्र हे आपले देव आहेत,कारण निसर्ग आपला देव होतो तेव्हा धर्माचं लेबल लागत नाही.अनेक कविंनी बदललेलं जग टीपलं पण कादंबरीत ते आलं नाही,कारण कादंबरी देशीयतेकडे झुकली आहे.अनेक बोलीभाषा मरत आहेत,त्या वाचल्या पाहिजेत.अनुवादित साहित्य वाचलं पाहिजे.जग आणि जगणं बदललं की साहित्यही बदललं पाहिजे." असे विवेकपूर्ण विवेचन मुंबईचे प्रसिद्ध कवी हेमंत दिवटेंनी केले.


ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित ' मराठी काव्यातील जागतिकीकरण ' परिसंवादात बोलत होते.मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉ सुभाष शेकोकर होते तर उपस्थितीत शहापूरचे कवी संदेश ढगे,मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर,वाणिज्य विभागप्रमुख डॉ रेखा मेश्राम, डॉ युवराज मेश्राम, डॉ पद्माकर वानखडे,प्रा मिलिंद पठाडे उपस्थित होते.


कार्यक्रम प्राचार्य डॉ.डी एच गहाणेंच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.कवी संदेश ढगेंनी व हेमंत दिवटेंनी आपल्या जागतिकीकरणावरील रचना सादर करुन परिसंवादात रंग भरला.प्रास्ताविक डॉ धनराज खानोरकरांनी तर संचालन,आभार डॉ पद्माकर वानखडेंनी केले.कार्यक्रमाला मराठी वाड्मय मंडळाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !